Catagories

न मिळे अशी मौज पुन्हा

न मिळे अशी मौज पुन्हा

या दत्तजयंती चे आणखी एक लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे चैतन्यराज प्रभुंचे माणिक प्रभु चरित्रावर विश्लेषक प्रवचन आणि त्यास पद्यमालातील पदांचे समर्पक विश्लेषण ची जोड देत श्रोत्यांना परम आनंदाची अनुभूती देत होती. चैतन्यराज यांचे संगीतमय प्रबोधन ऐकताना एक आठवण आली ती मुद्दाम येथे सांगू इच्छितो. मार्तंड प्रभु जेव्हा एखादे पद लिहून झाले की ते पद कोणाला तरी प्रथम ऐकवावे या हेतूने कोणाला तरी ऐकण्यासाठी बोलवावे तर तसा सेवक मिळत नसे असे वारंवार घडत असे त्या वेळी मार्तंड प्रभु म्हणत की काय हे लोक एकालाही यातला गोडवा कळत नाही सगळेच अगदी सारखेच आहेत असे म्हणत.

read more
योगक्षेमं वहाम्यहम्

योगक्षेमं वहाम्यहम्

एक छोटीशी झांजच ती! तिचे एवढे काय कौतुक??कौतुक एवढ्यासाठी की शंभर वर्षाहून अधिक काळ ही झांज आमच्या कुटुंबात असावी. कारण ही झांज आमच्या पणजोबांच्या बालपणापासून तरी नक्कीच आमच्याकडे आहे असे माझे आजोबा सांगायचे आणि पणजोबांचा जन्म १९०० सालचा होता. दुसरे असे की असा नाद व आवाजाचा गोडवा असलेली झांज आजपर्यंत शोधुनही कुठे मिळाली नाही. गणेशोत्सवात व नवरात्रोत्सवात बऱ्याच ठिकाणी आम्ही ही उपयोगात आणतो. ज्या आप्तांकडे आरती अथवा भजनाला आम्ही जातो त्यांचा आग्रहच असतो की येताना ही झांज आठवणीने घेऊन यावी.

read more
ज्ञानसागर

ज्ञानसागर

सगळे प्रभूने हिरावले, देहवासना हिरावली, आता सुख दुःखाच्या लाटांची काय तमा? अशी प्रभूने कृपाच केली सांगणारे प्रभूने मेरा सबकुछ छिना हे पहिल्या लाटेचे गाणे .ज्ञान नही अब कुछ करनेको यातील श्लेष चिंतनीय ठरला.त्यात न्हाऊन निघालो तोच सत्य एकच असते हे सूत्र जहाँ मै अडा हू द्वारे चपखल पटवून दिले. करो दस्तखत मै कोरी वही हू यातील समर्थता अगस्तिनच्या आचमनाची आठवण देऊन गेली.याही लाटेचा आस्वाद घेतला. मननाची डुबकी मारली. तोवर अजून एक लाट आली. अति सुंदर अशी ती लाट!! ती लाट म्हणाली,नाम आणि रुपात अडकेल तो प्रभू नाहीच. प्रभू तर त्याच्याही अतीत आहे. पण ते ज्ञान होण्यासाठी नाम हे साधन आहे . नाम जिसका है न कुछ ने नवा आयाम दिला. उत्तरोत्तर उपनिषदांकडे कूच करताना ज्याची सर्वांना जिज्ञासा असते ते ब्रह्म कुठे पाहायला मिळेल का? याचे उत्तर वही है ब्रह्म उसे पहचान मध्ये विस्तृत सांगितले, एका अर्थी ब्रह्मदर्शन च घडवून दिले.

read more
वेदांत सप्ताह भाग बारावा

वेदांत सप्ताह भाग बारावा

दिंडी आता श्री मारुती मंदिरासमोर आली होती. एव्हाना पहाटेचे पाच वाजत होते. सुरांचा आणि वाद्यांचा कल्लोळ त्याच जल्लोषात त्याच उत्साहात सुरू होता. चैतन्याची ही अभूतपूर्व अनुभूती होती. येथेही माणिकनगरवासियांचा श्रीजींच्या स्वागतासाठी ओघ सुरुच होता. श्री मारुती रायासमोर “जय देव जय देव जय जय हनुमंता” ही आरती म्हटली गेली. त्यानंतर “प्रसवली माता तुज वायुसुता”, “गुज बोलवेना बाई, सुख सांगवेना बाई, स्फूर्ती आवरेना”, “आता जाई रे शरण जरी धरिसी चरण” ही पदे म्हटली गेली. पिंपळाच्या झाडाखाली पहाटेच्या नीरव शांततेत या पदांची गोडी प्रचंड जाणवली. वाद्यांच्या या कल्लोळात पिंपळही आपल्या पानांची सळसळ करून जणू ह्या दिंडीमध्ये आपणही सहभागी असल्याची जाणीव करून देत होता. श्री माणिक प्रभुंच्या काळापासून‌ ह्या मारुती मंदिराचे महत्त्व आहे. श्री मारुती मंदिरापासून दिंडी आता श्री व्यंकम्मा मातेच्या मंदिरापाशी आली होती. हे अंतर जेमतेम दहावीस पावलांचे असेल. ह्या वाटेवर “स्फुरद्रुपी श्री जगदंबे, सच्चिदानंद प्रतिबिंबे” चा जयघोष झाला. दिंडी आता श्री व्यंकम्मा मातेच्या मंदिराच्या आवारात आली होती. आज श्री देवी व्यंकम्मा अष्टभुजा रूपात सजली होती. देवीच्या काठी हातात शस्त्रे होती. महाप्रसादाचे भोग देवीला अर्पण करण्यात आले होते. देवीसमोर अनेक ओट्या भरल्या होत्या. दिंडीतून आपली लेकरं आपल्याला भेटायला आलेली पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. श्री

read more
वेदांत सप्ताह भाग नववा

वेदांत सप्ताह भाग नववा

माणिक क्विझ… आपण श्री माणिक प्रभु व त्यांच्यानंतरचे पीठाचार्य, तसेच श्री माणिकप्रभु संस्थान आणि त्यांचे उपक्रम, कार्य ह्याबाबत किती जाणतो, ह्याबद्दलची खेळाखेळातून साकारलेली प्रश्नमंजुषा. संध्याकाळी साडेसहा वाजता श्री प्रभुमंदिराच्या पटांगणात माणिक क्विझला सुरुवात झाली. समोरचे पटांगण प्रभुभक्तांनी अगदी फुलून गेले होते. रवि, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि अशा सात टीम्स यात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे पूर्ण सूत्रसंचालन श्री चैतन्यराज प्रभुंनी केले. पहिल्या फेरीमध्ये चार भाग होते आणि त्यातून मिळालेल्या गुणांच्या आधारावर पहिल्या चार जोड्या अंतिम फेरीत प्रवेश करणार होत्या. पहिल्या फेरीत श्री प्रभुचरित्रामधील बारकाव्यांबद्दल प्रश्न होते. आपण श्रीप्रभुचरित्र केवळ वाचतो की अगदी समरसून वाचतो? त्यावर मनन चिंतन करतो का? आपण त्याचे पारायण करतो का? आणि पारायण करून श्री प्रभु आपल्याला किती समजले? ह्याचा एक सुंदर परिपाठ श्री माणिक क्विझ घालून देते. त्यानंतर श्रीप्रभुपदे, पीठाचार्यांचे दौरे, श्री प्रभुमंदिर परिसरातील वेगवेगळ्या चिन्हांचे चित्र आणि व्हिडीओ दाखवून त्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. श्री प्रभु संस्थानाचे कार्य ह्याबाबतीत आपल्याला किती माहिती आहे? आपण श्री संस्थानाशी किती आत्मीयतेने जोडले गेले आहोत? याचीसुद्धा जाणीव ह्या क्विझच्या माध्यमातून आपल्याला होत असते. प्रश्नमंजुषेदरम्यान प्रेक्षकांनाही प्रश्न विचारले जायचे किंवा स्पर्धकांना न देता आलेले प्रश्न प्रेक्षकांना विचारले जायचे. बरोबर उत्तर देणार याला चॉकलेट बक्षीस मिळाले. दोन फेऱ्यांमध्ये श्री माणिकप्रभु संस्थानच्या पिठाच्यार्यांच्या लीला आणि त्यांचे सामाजिक कार्य यांचे माहितीपर लघुपट दाखवले जायचे. स्पर्धकांना प्रत्येक फेरीमध्ये उत्तरासाठी त्यांना दहा सेकंदाचा वेळ दिला जायचा. एखाद्या स्पर्धकाला जर त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही तर तो प्रश्न दुसऱ्या स्पर्धक आकडे अग्रेषित केला जायचा. त्याचे अधिकचे गुण त्या त्या जोडीला मिळायचे. पहिल्या फेरीअखेर आमची जोडी चौथ्या क्रमांकावर होती. अंतिम फेरीसा

read more
वेदांत सप्ताह भाग आठवा

वेदांत सप्ताह भाग आठवा

सुरुवातीलाच गीता म्हणजे गीत, गीता म्हणजे परमेश्वराने गायलेले गीत. गाण्यामध्ये मोठ्यात मोठ्या गोष्टीला कमीत कमी शब्दात बांधण्याची आणि ते हृदयात ठासवण्याची क्षमता आहे. श्रीमद्भगवत गीतेमध्ये माधुर्य आहे म्हणूनच ती हृदयात उतरते. गीतेमध्ये कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग सांगितला आहे. कर्मयोग आणि भक्तियोग समांतर आहे, असे समजतात. कर्मयोगाशिवाय भक्तीयोगाची पात्रता नाही आणि भक्तीयोगाच्या अनुष्ठानाशिवाय ज्ञानयोगाची प्राप्ती नाही. भक्तियोग साधकांस बांधून ठेवतो, प्रत्येकाने गीतेतून ज्ञानयोग  शिकायला हवा, ह्या ज्ञानयोगानेच मुक्ती प्राप्त होते.

read more