विशिष्ट वेळ
श्रीप्रभूंनी पुन्हा केशवरावांकडे वळून म्हटले, “श्रीदत्तप्रभूंना आपण काही अर्पण केल्याशिवाय तो कंबर कसून धावून येणार नाही. त्यामुळे श्रीदत्ताला काहीतरी अर्पण करून तुझे इप्सित साध्य करून घे!” श्रीप्रभूंची वाणी ऐकून, “आपण अंतर्साक्षी आहात आणि आपल्याला सगळेच माहीत आहे,” असे केशवराव श्रीप्रभुंना म्हणाले. त्यावर श्रीप्रभूंनी पुन्हा आपल्या मधुरवाणीने म्हटले, “आपण म्हणता ते सर्व खरे आहे! परंतु या क्षणाला आपल्याकडे जे काही आहे, तेवढेच श्रीदत्ताला अर्पण करा, पुढचे आम्ही पाहून घेऊ!” त्यावर केशवरावांनी “आपल्याकडे केवळ आठ आणेच आहेत,” असे श्रीप्रभुंना सांगितले. त्यावर भक्तवत्सल श्रीप्रभु अत्यंत प्रसन्नतेने म्हणाले, “श्रीदत्ताला तेवढेही पुरेसे आहेत. त्याने श्रीदत्तप्रभु प्रसन्न होतील. आता श्रीदत्तप्रभु कंबर कसून आपणांस जहागीर मिळवून देतील,” असे म्हणून श्रीप्रभु काही झालेच नाही या आवेशात मौन धरून स्तब्ध राहिले.
श्रीजींचे शिवस्वरूप दर्शन
भक्तांचे ते सर्व ताप-दुःख भगवान नीलकंठाप्रमाणे हलाहल विष म्हणून स्वतः प्राशन करतात आणि आपल्या अंतरात सामावून घेतात. एवढा क्लेश सोसूनही श्रीप्रभूंची वृत्ती सदैव शांत, प्रसन्न आणि स्थिर असते; ही शांतता जणू शिवशंकरांनी मस्तकावर धारण केलेल्या शीतल चंद्रकलेचेच प्रतीक आहे.
प्रभू जवळ येतील
प्रभूने दिलेल्या या जीवनाचा भरभरून उपभोग घेणं, प्रत्येक अनुभवाबद्दल कृतज्ञ राहणं आणि आपलं जगणंच आनंदाचा सोहळा बनवणं…या पलीकडे आयुष्य म्हणजे आणखी काय असतं? तुम्ही !!एक पाऊल प्रभूंच्या जवळ आलात तर ते दहा पाऊल तुमच्या जवळ येतात!! ..आणि प्रभूंनी म्हटलेच आहे !!आम्हाला धरता येते पण सोडता येत नाही!!
दंड योजना
आज गुरुगंगा नदीवर झालेले प्रदूषित आक्रमण कोणाच्याच नजरेतून सुटू शकत नाही. त्यासाठी सजग असणारे आदरणीय श्री आनंदराज महाराज आणि आदरणीय श्री चैतन्यराज महाराज यांच्या सशक्त नेतृत्वाखाली भव्य लोकसमूह एकत्रित झालेला पाहिला. दोन्ही सन्मानियांची देहबोली रोखठोक असली तरी दोन परस्पर विरुद्ध गुणांचा कमाल मिलाफ आढळला.भाषेतला अत्यंत संयम पण तेवढीच दमदार तडफ. दुर्मिळ संगम! आज पुनश्च एका दासबोधातील ओवीचे दर्शन घडले.
हे धकाधकीची कामे।तिक्ष्ण बुद्धीची वर्मे।भोळ्या भावार्थे संभ्रमे।कैसे घडे।।19.7.19।।
प्रभु का बाल रूप
वृंदावन का कृष्ण भयो है, हर नर-नारी कहते थे, बाल प्रभु को गोद में लेकर उसकी बलैया लेते थे। वृंदावन का कृष्ण भयो है, हर नर-नारी कहते थे, बाल प्रभु को गोद में लेकर उसकी बलैया लेते थे। वृंदावन का कृष्ण भयो है, हर नर-नारी कहते थे, बाल प्रभु को गोद में लेकर उसकी बलैया लेते थे।वृंदावन का कृष्ण भयो है, हर नर-नारी कहते थे, बाल प्रभु को गोद में लेकर उसकी बलैया लेते थे।वृंदावन का कृष्ण भयो है, हर नर-नारी कहते थे, बाल प्रभु को गोद में लेकर उसकी बलैया लेते थे।
सुखाचे माहेरघर
वर्षातून अनेक वेळा आपण माणिकनगरला जातो. राजोपचार पूजा आणि विविध संस्थानिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो. आणि जेंव्हा – जेंव्हा आपण माणिकनगरमध्ये असतो, तेंव्हा प्रत्येकासाठी ते दिवस खऱ्या अर्थाने “माहेरसुखाचे” असतात—मग ती स्त्री असो, पुरुष असो वा एखादा बालक असो.
पण यामध्ये मला नवल याच वाटतं ते म्हणजे—या माहेरसुखाच्या दिवसांमध्ये आपण नकळतपणे श्रीजींकडून खूप काही शिकत असतो.





Recent Comments